STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

ये थोडं जीवन जगू

ये थोडं जीवन जगू

1 min
11.7K

खूप निरस झालंय सखे 

ये थोडं जीवन जगू 

एकमेकात मिसळून जरा 

हे क्षण जवळून बघू ||0||


उदासीला सीमा हवी 

दु:खालाही अंत हवा 

जीवनाच्या पुस्तकात 

वाचु एक धडा नवा 

कितीही वादळं आली तरी 

एकमेका धरून तगू 

एकमेकात मिसळून जरा 

हे क्षण जवळून बघू ||1||


विझलेलं हे जीवन भासे 

नावीन्य ना उरले काही 

काहीतरी चुकतंय आपलं 

धूसर या दिशा दाही 

आग हृदयी पेटवून 

पुन्हा पुन्हा धगधगू 

एकमेकात मिसळून जरा 

हे क्षण जवळून बघू ||2||


दुःखाच्या अंधाराने 

घाबरून जायचं नसतं 

दिसतं त्याच्या बऱ्याचदा 

सखे विपरीत असतं 

प्रेमाच्या किरणांनी मिठीत 

येऊन आता झगझगू 

एकमेकात मिसळून जरा 

हे क्षण जवळून बघू ||3||


मिठीत तुला घेताना 

आकाशाला कवेत घेतो 

तुझ्यात विश्व पाहताना 

तुला प्रेमविश्वात नेतो 

श्वासात श्वासा मिसळून 

एकमेकांना बिलगू 

एकमेकात मिसळून जरा 

हे क्षण जवळून बघू ||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance