STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy

4  

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy

ये रे कृष्णा!

ये रे कृष्णा!

1 min
300

ये रे कृष्णा, ये रे सख्या

आज तुला यावं लागेल

कोणीच नाही मदतीस माझ्या

तुलाच माझी लाज राखावी लागेल


द्रौपदी च्या वेळेस आला होतास

अगदी तसाच ये रे धावून

गिधाड,लांडग्यांच्या तडाख्यातून

ने रे मला वाचवून


त्यावेळेस चिरहरण होताना

सर्वच हतबल झाले होते

आजही मी कृष्णा,देवकीसुता

तुझीच वाट नेटाने पाहते


आजच्या काळात सुद्धा

खूप आहेत रे दुर्योधन

पण, आजही तू येशील विचाराने

प्रार्थना करते मी मनोमन


द्रौपदीस वस्त्र पुरविली तू

वाचविलीस तिची लज्जा

इथेही ये माधवा

दे ह्या सार्यांना सजा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract