वटपौर्णिमा
वटपौर्णिमा
फिके चांदणे हे झाले
झाली धुसर ह्या वाटा
महामारी हाहाकार
रक्ताळल्या पराकाष्ठा
स्वप्न फुले ओंजळीत
चाले विरह प्रवास
स्मृती निरोप क्षणांची
वटपौर्णिमा उदास
खेळ सारा प्राक्तनांचा
अश्रू झरे लपवित
क्षण भंगुर सोहळा
देह माती मिसळीत
आठवत निशिगंध
दिव्यत्वाचा मृगजाळ
धैयशील वाटचाल
दैवी सुकाळ दुष्काळ
जन्म अतुल्य मानवा
सुसंस्कार मौल्यवान
शोधे वैकुंठ भरारी
जन्म मृत्यु वरदान
