STORYMIRROR

Nilesh Bamne

Inspirational

4  

Nilesh Bamne

Inspirational

वटपौर्णिमा...

वटपौर्णिमा...

1 min
783

वडाला प्रदक्षिणा घालणारी 

प्रत्येक ती सावित्री नसते 

आणि ज्याच्यासाठी ती प्रदक्षिणा घालते

तो सत्यवान नसतो...


सात जन्मी हाच जोडीदार लाभावा 

हे स्वप्न हल्ली कोणीच पाहात नाही...

ती सवित्री आज होणे जवळ - जवळ अशक्य...


आजच्या सत्यवनाला तरी कोठे हवी आहे सवित्री ? 

त्याला हवी असते रंभा, मेनका आणि उर्वशी...

तरीही भावना महत्वाची,

त्या भावनेत दडलेले प्रेम अधिक महत्त्वाचे...


सात जन्म कोणी पाहिलेत ? 

याच जन्मात सत्यवनाला सावित्री

आणि सावित्रीला सत्यवान मिळावा

हे एक स्वप्न ठरले आहे...


तरीही बुडत्याला काडीचा आधार म्हणून

वटपौर्णिमा साजरी होत राहावी...

प्रत्येक नवरा बायकोने एकमेकात

सत्यवान - सावित्री निदान निर्माण करू पहावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational