वसुंधरा
वसुंधरा
वसुंधरा
जपू या सारे
शुद्ध, हवा, पाणी
मिळती स्वच्छ गार वारे
वसुंधरा
छान नटली
हिरवाईने कशी सजली
चोहीकडे मस्त अशी बहरली
वसुंधरेला
आपण जपूया
खूप झाडे लावूया
वसुंधरेचे रक्षण आपण करू या
वसुंधरा
नटूनथटून बसली
गालात खुदकन हसली
साऱ्यांची मने तिने जिंकली....
वसुंधरा
निसर्गाची किमया
जशी जादुगर दुनिया
चला वसुंधरेला आपण जपू या...