वर्हाडी प्रेम कविता
वर्हाडी प्रेम कविता
प्रिय बायको .. तुयासोबत बोललं की मन लय मोकळ झाल्यासारखं वाटत !
जणू प्रखर तापलेल्या उन्हात तु थंड वार्याच्या रूपानं येऊन स्पर्श केल्यासारख वाटतं !!
एवढी कशी व सुंदर तु मनाले मोहून टाकणारी !
जणू बागेत उमललेल्या गुलाबाले लाजवणारी !!
जवा मले कळलं की तु मायी होणारी बायको !
तवा तुले पाहतचं बसलो एकटक जणू तुया प्रेमात झालो मी सायको !!

