महिला दिन
महिला दिन
1 min
176
महिला दिन जणू सण नव्हं
आज साजर करावं अनं
उद्या विसरून जावं ..!!
द्यावा सन्मान तो आज दिनी,
तोची सन्मान तिला कायम असावं ..!!
महिला दिन म्हणजे
मायेची ती आठवण,
जिच्या असण्याने
येई घराला घरपण ..!!
ठेवी लक्ष्मी पाऊले घरा
सर्वांशी एकरूप होऊनी ,
कुटूंबासाठी दिवस-रात्र
झटती स्वतःच्या इच्छा
आकांक्षा बाजूला ठेऊनी ..!!
दुःख लपविता प्रसन्न चित्त
राहूनी पायावरची जखमेला
साडीने झाकून घेई ,
अशा या मातेसमान स्त्री
च्या मायेसमोर देव सुद्धा
नतमस्तक होई ..!!
