पहाटेचा मंद वारा
पहाटेचा मंद वारा
पहाटेचा तो मंद वारा येऊनी स्पर्श करूनी बोलूनी जातो क्षणोक्षणी ..!
अशा या वार्यामधे कोवळ्या उन्हात करूनी देतो तुझ्या स्पर्शाची जाणिव असता एकटाक्षणी !!
बघुनीया रंगीबेरंगी फुले आणि सर्वत्र असे हिरवेगार दृश्य देती तुझ्या सौंदर्याची जाणिव करूनी ...!
असा हा पहाटेचा मंद वारा स्पर्श करूनी बोलूनी जातो क्षणोक्षणी !!
सळसळणारी कोवळी पाने जशी तुझ्या पायाची पैंजन करी छनछन मन जाई भरूनी ..!
असा हा पहाटेचा मंद वारा स्पर्श करूनी बोलूनी जातो क्षणोक्षणी !!
सुगम सकाळी कोकिळा च्या मधुर स्वरांनी होता आभास चाहूल तुझ्या येण्याची कळताच येती डोळे भरूनी ..!
असा हा पहाटेचा मंद वारा स्पर्श करूनी बोलूनी जातो क्षणोक्षणी !!