वंदन महामानवाला
वंदन महामानवाला
कोटी कोटी वंदन माझे
वंदन महामानवाला,
भिमाने च बनविले खरे
बनविले माणूस आम्हाला.
पशू समान होते जिने
गावकुसाबाहेर ते राहाणे,
नव्हते कुठले हक्क अधिकार
कैवारी तोच खरा झाला...
दारिद्र्यात,खितंपतलेला
वंचित पिडीत दीन दुबळा,
होता सारा समाज अज्ञानी
उध्दार भिमाने च केला...
मिटला कलंक अस्पृश्यतेचा
मार्ग मिळाला परिवर्तनाचा,
संघटित होऊन संघर्ष करुया
आला अर्थ खरा जगण्याला...
घेऊन भीमाची शिकवण
परिवर्तन हवे संघटन,
मावळला अंधार तो
वंदन भीम सूर्याला...
