STORYMIRROR

Manisha Patil

Inspirational

3  

Manisha Patil

Inspirational

विठ्ठला

विठ्ठला

1 min
198

तहानलेला वारकरी दमला,             

 कान्होपात्रेच्या झाडाखाली विसावला ! 


गाभाऱ्यातील विठ्ठल वाट पाहून थकला, 

वारकरी माझा कुठे राहीला ? 


स्वत:च मंदिरातून बाहेर आला, 

रखरखत्या उन्हात अनवाणी चालला ! 


पूर्ण मंदिराला वेढा घातला, 

कान्होपात्रेच्या झाडाखाली वारकरी दिसला ! 


त्याचा कोमेजलेला चेहरा पाहून, विठ्ठल गलबलला ! 

प्रेमाने हाक मारताच, वारकरी उठून बसला ! 


झाले काय तुला भक्ता, 

विचारत विचारत नयनांतून बरसला! 

वारकरी स्मित हसला, 

विठ्ठलाकडे पाहून बोलला ! 


नयनांतून नको बरसू विठ्ठला, 

रखरखत्या उन्हातून आलोय 

तुझ्या वारीला ! 

म्हणून जरा वाटे मी तुज दमलेला ! 


नको करु रे चिंता , 

पण जरा वाईट वाटले मनाला ! 

अजून रे मी तहानलेला, 

तू पाऊस होऊन बरस विठ्ठला ! 


विठ्ठल समजून गेला, 

रुप सरींचे घेऊन आला ! 

मनसोक्त बरसला , 

तहानलेला वारकरी सुखावला ! 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational