भाकरीचा चंद्र
भाकरीचा चंद्र
भाकरीच्या चंद्राभोवतीच बालपण सरतय ,
जीवनाचे हेच का सत्य त्यांना कळतय,
बालपण दिलखुलास जगायचं की.......
जगण्यासाठीच केवळ धडपडायच ं
एवढचं जग का त्यांना दिसतयं
जीवनाचे हेच का सत्य त्यांना कळतंय
पाठीवरती ओझं दप्तराचं घ्यायचं की...
ओझं फक्त दोन वेळेच्या भुकेसाठी वहायचं
या विवंचनेत आयुष्य फिरतयं
जीवनाचे हेच का सत्य त्यांना कळतंय
वेगळ्या वाटेने चालायचं की
रोजच्या दैनंदिनीतच अडकायचं
या प्रश्नावरच सारं अडतयं
जीवनाचे हेच का सत्य त्यांना कळतंय
भाकरीच्या चंद्राभोवतीच बालपण सरतय
जीवनाचे हेच का सत्य त्यांना कळतंय
