STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

विषय:- माय मराठीची गोडी

विषय:- माय मराठीची गोडी

1 min
241

काय अन् किती गं सांगू

माझ्या मराठीची गोडी‌ |

आवाक्या बाहेरचे माझ्या

बुद्धी ही कमी पडते थोडी | |१| |


माय मराठीची महती साक्षात

देई संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी |

अमृताशीही पैज जिंकेल अशी

वागदेवी सरस्वती तीच वागेश्वरी | |२| |


माय मराठीची अस्मिता हवी

खरंतर आपणच जपायला |

कित्येक बोली भाषा अलगदपणे 

येतात तिच्यामागे लपायला | |३| |


इतर भाषांशी तिची तुलना करणं

नसे तिला मुळातच रुचणारं |

अनुपम अतुल्य सौंदर्य तिच्याकडे

उपमा आणखी काय सुचणार? | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational