विषय:- माझिया प्रियाला प्रीत क
विषय:- माझिया प्रियाला प्रीत क
नदीतीरी बैसले| वेचण्या फुले|
वेचता फुले|प्रियाचे हृदय मम गवसले||१
वेचता फुलांचा गंध|मन होई धुंद| निखळले बंध| जडलासे अनोखा छंद||२
गुलाब की मोगरा? स्पर्श गोड खरा| गंध भुलवणारा| माळला मी गजरा||३
माळता गजरा| निरखती नजरा| उर होई घाबरा|प्रिया ही होई बावरा||४
माळता प्रितीची फुले| मन हर्षले| भान हरपले|सख्याचे वेड मज लागले||५
फुलती का प्रितीची फुले? ना तुला समजले| मला न उमगले| स्नेहबंध का जुळले?६
मना लागले पिसे| प्रियाची दिसे|होईल का जग हसे? मनाला आवरु तरी मी या कसे?७
डोळ्यांत काजळ| उरात खळबळ| अनोखी तळमळ| प्रितीची येता ती उबळ||८
ऐन दचपारची वेळ| सोसवेना तप्त झळ|गाठावा की तळ? कोठून आणावे ते बळ? ९

