विस्कटलेले आयुष्य
विस्कटलेले आयुष्य
जगायच होतं तिला
कोर करकरीत आयुष्य
तिच्या राजकुमारासाठी
नी् नवरी होवून
नव्या घरचा उंबरठा
ओलांडायचा होता
पण या माणसांच्या गर्दीत
विटाळलेल्या नजरांनी
तिच्यावर घाव घातला
आणि भातुकलीचा खेळ
नको त्या उंबरठ्यावर
आणून सोडला
ती रडत होते ओरडत होते
आक्रोश तिचा कोणीच एकत नव्हते
तिची वेदनाही कोणाला
कळत नव्हती
आयुष्याचे लक्तरे होतांना
ती रोज नव्याने पहात होती
कुठे कसा मांडावा
भातुकलीचा खेळ
तिलाच कळत नव्हते
विस्कटलेले आयुष्य ती
रोज जगतं होते
जगावं कि मरावं
प्रश्न तिच्यासाठी गंभीर होता
त्या गुलाबी मंडईचा
उंबरठाही ओलांडता येत नव्हता
जेव्हा जेव्हा ती
सुर सनईचे एकायची
तेवा झाकून घ्यायची देहावरचे शापित स्पर्श
आणि घरावरून जाणारी लग्नाची वरात
ती दारात ऊभी राहून पहायची
जणू तिला घ्यायला राजकुमार आलाय
म्हणून एकसारख बघायची
