STORYMIRROR

Umendra Bisen

Classics Others

3  

Umendra Bisen

Classics Others

विश्व बंधुत्वाचे नाते

विश्व बंधुत्वाचे नाते

1 min
322

आहे हे विश्वची माझे घर

आहोत ईश्वराची लेकरं,

गुण्या गोविंदानेच नांदूया

करू माणूसकीचा जागर.


आहे हे विश्वची माझे घर

कल्पना करूया ही साकार,

देवू एकमेकांना आधार

विश्वबंधुत्वाचा पुरस्कार.


हे विश्व आहे एक घरटं

वास्तव्य करू बंधूभावाने

वसुदेव कुटुम्बकम ही

भावना रूझवू एकतेने.


प्रेमभाव,संस्कृती,साहित्य

ज्ञान,करू आदानप्रदान,

हे विश्व आपले आहे सर्व

समतेचे मांगू वरदान.


आहे हे विश्वची माझे घर

मिळालेली एक धरोहर,

जपूया त्याला एकसंघाने

जगूया हर्षाने सृष्टीवर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics