STORYMIRROR

Gauspasha Shaikh

Inspirational

3  

Gauspasha Shaikh

Inspirational

विझणाऱ्या दिव्याची वात मी

विझणाऱ्या दिव्याची वात मी

1 min
175

धरून चिमटीत ओढ कितीही

राख करून मला सोड कितीही

सर्वस्व अर्पणारी एक जात मी

विझणाऱ्या दिव्याची वात मी


चिरून अंधाराला पेरली आभा

केला प्रकाशमान घराचा गाभा

तीरी येऊन विरणारी लाट मी

विझणाऱ्या दिव्याची वात मी


डोईवर वाहिल्या तप्त ज्वाला

तुजपुढे सारला तेजाचा प्याला

रात जागून उजाडली पहाट मी

विझणाऱ्या दिव्याची वात मी


साक्षी आहे काजळी भिंतीची

ऐकली केवळ स्तुती पणतीची

लिहून आणले कसे ललाट मी

विझणाऱ्या दिव्याची वात मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational