STORYMIRROR

Gauspasha Shaikh

Others

3  

Gauspasha Shaikh

Others

काळी रात्र कोण पाहिल ?

काळी रात्र कोण पाहिल ?

1 min
133

पाहिलीस रम्य पहाट तू

काळी रात्र कोण पाहिल ?

पाहिलास बहर तारुण्याचा

म्हातारपण कोण पाहिल ?

मिरवलेस काळेभोर केस तू

केसांमध्ये चांदी कोण पाहिल ?

राखलीस तुझी त्वचा तुकतुकीत 

सुरकुत्या मुखी कोण पाहिल?

गाजवलीस सत्ता कुटुंबावर तू

कुटुंबातील गुलामी कोण पाहिल?

भरलीस अन्न धान्याने कोठारे तू

साध्या चहाची वाट कोण पाहिल ?

कमावलीस मालमत्ता भरगच्च तू

संपत्तीची उधळपट्टी कोण पाहिल?

घेतल्यास जमिनी बेसुमार तू

तुझी छोटीशी कबर कोण पाहिल?


Rate this content
Log in