STORYMIRROR

Gauspasha Shaikh

Romance

3  

Gauspasha Shaikh

Romance

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो

1 min
186

तिचे बोलणे गडे,मधापरी मधुर गोड

सौन्दर्याला तिच्या,साधेपणाची जोड

ती बोलत होती,मी ऐकतच राहिलो

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो....


ओठ तिचे पाकळी,जशी गुलाबाची

डोळे तिचे काजळी,जशी अंबुदाची

तिचे कोमल गाल,न्याहाळतच राहिलो

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो......


केस सावरत उभी,ती भासते अप्सरा

मुखावर भाव तिच्या,खट्याळ हसरा

बघायचे नाही म्हणत बघतच राहिलो

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो


तिचा पडला कटाक्ष,मज पामरावर

वाटले पुष्पाने उलघडले,गुज भ्रमरावर

पवनापरी अलगद,वाहवतच राहिलो

पाहता क्षणी तिला,पाहतच राहिलो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance