STORYMIRROR

Pandit Warade

Action Others

3  

Pandit Warade

Action Others

वीरपुत्र

वीरपुत्र

1 min
479

वीरपुत्र भारताचे

सर्वश्रेष्ठ या जगात

यांच्या रक्ताच्या थेंबात

देशप्रेम ओतप्रोत।।१।।


येता कोणते संकट

उठे होऊन उत्कट

पडे तुटून जोमाने

कारवाई झटपट।।२।।


आला चालून गनीम

त्याला माघारी पाठवू

त्याच्या घरात घुसून

आम्ही मुंडके उडवू।।३।।


माती भारत देशाची

आम्ही भाळावर लावू

मायभूमीसाठी आम्ही 

प्राण हातावर घेऊ।।४।।


करू निधड्या छातीने

गनिमाची वाताहत

वेळ येता हात घालू

काळाच्याही जबड्यात।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action