STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

वेदना........अदृश्य मनाच्या

वेदना........अदृश्य मनाच्या

1 min
199

अदृश्य मनाच्या वेदना

ठाव घेती मनाचा 

जाणिवेची सल ती

भाग होते तनाचा

   हुंदका तळमळतो वेदनेचा

   ओघळणाऱ्या आसवांचा

   श्वासातही लपला पुरावा

   न दिसणाऱ्या भासवांचा

अगतिकता वेदनेची

साठा अव्यक्त भावनांचा

निरूत्तरित राहीलेल्या

माझ्या निरागस प्रश्नांचा

   वेदनेतील गोंडस हास्य

   साक्ष खळखळत्या ओठांचा

   देवच साक्षीदार माझ्या

   हसऱ्या धडधडत्या ठोक्यांचा

भावनाशून्य जगी या

जीव गुदमरतोय नितीमत्तेचा

वेदनेच्या पार कोमेजलेल्या

एका भयावह अफाट सत्तेचा.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy