वेडी प्रीत
वेडी प्रीत
पाहुनी तुझे गोड हास्य
मन माझे भुलते,
येता आठवण तुझी
प्रेम कळी ही खुलते
शहारून जात अंग
बहरून येतो रंग
आठवण येता तुझी
होतो मी तुझ्यात दंग
सांग काय करू मी ? सखे
जीव माझा तुझ्यात गुतला
तुझ्या प्रीतीचा काटा
खोल माझ्या मनात रुतला
विरह सहन तुझा
सखे होत नाही मला
आपल्या भेटीसाठी
उद्याचा दिवस कशाला ?

