वास्तवच पाहतोय
वास्तवच पाहतोय
मी एक वास्तवच पाहतोय
रोज रास वृक्षांची कत्तल करताना सोसतोय
बांधावरची गायरानातली झाडे तुटताना पाहतोय
सरकारचं निसर्ग संवर्धनाचं धोरण
माणसाच्या जिव्हारी जिवंत आणि मयत झाल्यावरही कसं येतं ते सहन करतोय
काम वाचवं मनून दुसरं काम करतोय
त्याकरिता मी ही निसर्गबद्दलचा आवाज कमी करतोय
फळबाग करावी तर पैसा अडका खुप जातो
चालू पिक मोडावं तर कुठे कोणी उपासी राहतोय
सगळंच गणित चुकलय माझं
आता लावा झाडाची रोपं नाहीतर उपटा तसच
किती सांगू भाऊ तत्वज्ञान मी तर जगाला
मलाच जागा मिळत नाही ओ साहेब चार झालं लावाला
बांधाला बांध रेटतो आमच्या कुंपनच शेत खातं
म्हणून माझं घर फक्त पैश्यावरच चालतं
गैस शिगडी दिवा बत्ती सगळं कसं
आपोआप चालू होतं
ते बंद पडलेवर आणि फैसै नसलेवर
काय ती शेती बाडीचं आण निसर्गाचं ध्यान लागतं
म्हणूनच मी पण निसर्ग संशर्धनावरचा आवाज कमी करतोय
आपल्या घरात झाड नसलं तरी शेजारी बसू देतोय
तु पण लाव एखादं म्हणून सांगणाराच माती खातोय
झाडं लावून सरकार कुठं दारी देतोय
लावतोय लावतोय झाडं
काढतोय काढतोय दुष्काळची हाडं
काय उपयोग हुईल ती हुईल
पेपरामध्ये बातमीमध्ये फोटो तर येतो बरं
ठेकिदारी करताव साहेब रोजानं जावून पुढं सरकाचं
दिवा लावणी स्वप्न आमचं आण कसलं बरं सोंग
शेतकरी असून झाडाचं महत्व माहित नसावं
मग मी पण बापानं जपलेलं झाडं आडतीला घालतोय
कुठ आमचा मुख्यमंञी झाड चांगलं वाढलय तुडू नको मनून अनुदान देतोय
कविता करून कुठं पुस्तकाची माती चारणारा तज्ज्ञ चलतय का साहेब
आमचं रत्न आमचं स्वप्नं कोण जगल मरल टिकल टिकवल असलं पण मनोविकार झटकतोय
तोडणा का जोडणा का झाडं मेली कि
लोक पण मरतय
आता कशाला लाव सांगू ?
तोड बचाबचा बचाबचा बचाबचा
दिसतेलि तिथलं तोड आण लाव
तुझ्या तोंडाला गोड धोड
खाशील तर जगशिला माणसा मरशिला कि बिना
अन्नापाण्याचा मी कशाला सांगू तरन ऐकू तर
असला बेभरवशी सोहळा तो जो सरकार भरवतोय
झाडं तोडतोय कारण तंञज्ञानीच उडतोय
पैश्यानं मज्या घेणारी जनता शिकवाला मी काय
हनचा मंञी दिसतोय ?
म्हणून मी पण निसर्ग संवर्धनाबद्दल आवाज कमी करतोय !
ना अनुदान ना ठेकेदारी पैसा पिकवाची आणि
सर्जा राजा ची जोडी बनवाचीन पुन्हा हिणवाची
परंपरा मिरवतोय आण म्हणे मी चांगलं काम करतोय
तोंड पैसैवालाच चालवतोय पाय पण तोच हालवतोय
मी समजतो मी कशाला हिणवाला आलोय तर
हिणवालाच आलोय कुठं तुमच्या हद्दीत मला पर्यावरण
मंञि केलोय
रोप बनवाची अक्कल रोपविटिकेवाल्यालाच दिलोय
शेतकरी असून बी डोबाला विसलोय
सगळं विकत आणि मोफत शिधा भेटतोय
आता कशाला आमराई कड आण चिकू संञा मौसबी
असल्या झाडांना पोसतोय
मी पण निसर्ग संवर्धनाबद्दल आवाज माझा कमी करतोय
एका झाडा मागं किति आटा पिटा
हजारानं लावाचं असल तर सरपंच कि कड भेटा
कारण बाग उगवल टिकल कशाला बघतोय
मोकळ्या फट रानात टँक्टर आणि जेसीब
लावून गावातच घर चालतोय
आज पासून झाड लावू नका गड्यानो
कारण सरकारचा आपलं डोळं उघडं ठिवून
लोकालाच खुर्चीवर का बसवला म्हणुन
कराव्या लागलेल्या पापाच्या फळाचे
सडके बीज गोर गरिबाच्या दारात टाकताना दिसतोय
मी पण निसर्ग संवर्धनाबद्दल आवाज माझा कमी करतोय
तुमी पण करा कचरा कुंडी भरून घ्या ओ
सरकारच्या पापाच्या फळाच्या बिजाच्या
आण सोडा नाद त्या सरकारचा जनच्या पोटावर
शेतमध्ये टुमदार सिमेंटचे जंगल उभारतोय....
