वारी
वारी
(कोरोना काळात २वर्षे वारकरी दिसले नाहीत. त्यामुळे परमेश्वराला परत वारी सुरू व्हावी म्हणून केलेली आर्त प्रार्थना 🙏)
यंदाची वारी । सांग विठ्ठला ।
देवा वारकरी राजा । कुठे दिसेना ।
तुळशीचे हार। गळ्यात माळा ।
वारकऱ्यांचा। विठू सावळा।
मृदुंग वीणा । चिपळी टाळा ।
नाम जयघोष। ईठ्ठल विठ्ठला।
दिंड्या पताका। वैष्णवांचा मेळा ।
डोई वृंदावन । वैजयंती माळा ।
लाल पागोटे । बुक्याचा टिळा ।
दिसले नाही यंदा । लेकरे बाळा ।
पळवं संकट । टळू दे वेळा ।
वर्षांची पुण्याई । वाहिली तुला ।
अंतरी नांदतो । सावळा विठूराया।
भक्तांना सांभाळे। त्याचीच छाया।
परत होऊ दे । वारकरी गोळा।
कानाने ऐकू दे। विठ्ठल विठ्ठला ।