गावाकडचे जीवन (सहजीवन)
गावाकडचे जीवन (सहजीवन)
बांधकाम असते दगडी
म्हणून थंडावा असतो राखुन
बघता क्षणी डोळ्यांना मिळतो गारवा
आणि सुर्य प्रकाशही मिळतो झरोक्यांतून
अशा घरांची मौजच न्यारी
जिथे तिथे कडी, कोंयंडे आणि कपारी
परसदारी भरलेले असती रहाटाचे आड आणि विहिरी
स्वतः पिकविलेल्या शेतातील तांदूळ गहू बाजरी आणि ज्वारी
रसरशीत पेटलेल्या बंबाचे अंघोळीस कढत पाणी
न्याहरीस रोजच असते भाकरी अन् घरचे लोणी
शुद्ध हवेची तर रोजच असते मेजवानी
बैलगाडीतून सफर आणि शेकोटीची ऊब गोजीरवाणी
घड्याळाच्या काटयांवर नसते काम काही
कमी दामातही मिळते सर्व काही
ओतप्रोत माधुर्य साध्या जीवनातून ओसंडून वाही
सहजीवनाचा आनंद याहून अन्य नाही