फुले
फुले
1 min
276
आल्हाददायक भासती
डोळ्यांस ही ताजी फुले
सुवास येता मन जाई
भुतकाळात माझे खुळे
पितळी घरंगळ्यात सुवासिक
थंड अशा वातावरणात
घमघमाट सुगंधी फुलांच्या
पाकळ्यांचा ओसंडतसे गाभाऱ्यात
घराघरातील चैतन्य रोमांचीत
करीत असे अंगोपांगी
श्वासागणिक सुगंधाची
रेलचेल असे जागोजागी
चाफा चमेली केवडा अनंत बकुळी
तजेलदार फुलांची भरगच्च परडी पिवळी
देवघरातील पुजेचा निरांजनाचा मंद दिप
तेवतो मनात अजुनी..पुजेचा सुगंधी धुप
दगडी घरातील थंडाव्यात
सुगंधाचे जडलेले नाते
त्यासाठी तरी भुतकाळात
जाऊनी कधीतरी डोकवावे वाटे