सायंकाळ
सायंकाळ
1 min
168
पलीकडे माळरानावर
भरुन आले गच्च आभाळ
निळ्या डोंगरा आड दूरवर
गहिवरलेले कुट्ट ढगाळ
दिसे एखादयाच क्षणभर
वातावरणही शांत मवाळ
क्षणात वाजती धरणीवर
टप-टप मोत्यांचे मधुर टाळ
चम-चम चमकती पानांवर
पाचुंची रत्ने रानोमाळ
कुठूनशी आली माळावर
फडफडत बगळ्यांची माळ
सुरेख रंगसंगतीचे किमयागार
निसर्गरम्य क्षण लडिवाळ
विस्मयकारी असे खरोखर
सृष्टीची प्रसन्न सायंकाळ