Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shivani Vakil

Others

2  

Shivani Vakil

Others

ऋतुचक्र

ऋतुचक्र

1 min
64


उन्हाने काहिली झाल्यावर

आली आठवण पावसाची

तप्त घामाच्या धारांना

प्रतिक्षा होती वाऱ्याची

कुठूनसा आला अंगावर

गार पाण्याचा एक तुषार

हलली पाने वाऱ्यावर,

मवाळ वाटली ती दुपार

क्षणार्धात सुटले वारे

वाटसरुही उठले सारे

मेघ आकाशी जमले काळे

वीजेनेही पसरवले जाळे

मग बरसले अनेक तुषार

राग गाऊनी मेघ मल्हार

बाल बालके करती विहार

चिंब भिजून ऊडवित तुषार

मधेच टपकली एखादी गार

थंड झाला वातावरणाचा भार

रस्त्यावर पागोळयांची धार

उकाडा पळाला दुर फार

आल्हाददायक झाले वारे

हिरवे कंच पाचू चमचमणारे

ईंद्रधनुचे रंगही चकाकणारे

सृष्टी चे रुप हे मोहवणारे

हळुच कानाशी कुजबुजला

जाता जाता एक तुषार

वृक्ष भरपुर असता धरतीवर

प्राणवायु पसरतो चिकार

छायाही असते जमिनीवर

वातावरणही रहाते गार गार

तप्त उन्हातही दरवळतो मग

मोगऱ्याचा सुगंध अपार

वृक्षांमुळेच सोसता येतो नेहेमी

उन्हाच्या पाऱ्याचा भार,

वृक्षांच्या छाटणी मुळेच

तापमानाची वाढ होते फार

'वृक्ष जगवा, वृक्ष तगवा'

'वृक्षारोपण' हे ब्रीद बनवा

निसर्गाने ही धरा सजवा

ऋतुचक्राचा समतोल टिकवा


Rate this content
Log in