वादळ
वादळ
वादळाचा कसला भरोसा
जे सापडेल त्याला तो नेईल
वादळ होईल जेव्हा शांत
कोण साथ देईल?
वादळात झाले घर राख
ते वादळ आपले नाही
काट्यात खुपसले पाय
शिल्लक राहिले नाही काही
होता बांधलेला खोपा
छोट्या छोट्या प्रत्ना ने
विस्कुटूनी गेला खोपा
त्या एका वादळाने
पिले झाले बेघर
नाही राहिला कसलाही आधार
कोण रोकेल ते वादळ
मीच घेतली ती माघार
कधी कुठे केव्हा येईल
ते वादळ सांगता येत नाही...
वादळात ते घर
आता मात्र सुरक्षित नाही
पुन्हा नव्याने उभारणी घेण्यासाठी
मी झगडतो आहे,त्या वादळात
प्रयत्न माझे खूप आहेत
त्या अंधाऱ्या झगडणाऱ्या काळात...
