वाढदिवस मुलीचा
वाढदिवस मुलीचा
मुलगी माझी जशी अंगणी फुललेली तुळस
स्वभाव तिचा दिसे गगणी मंदिराचा कळस
असण्याने तुझ्या, घर आपले कसे गजबजते
सडा, रांगोळी, दारी तोरण घर असे सुंदर सजते
आवड शिकण्याची, शिकविण्याची ही भारी आवड
एवढ्या साऱ्या गोंधळात कशी काढतेस तू सवड
गणपती ची आवड खरी, अविट तुला गोडी
चतुर्थी चा उपवास, त्यात छान दिसते साडी
गुलाब जामची चव वाढते, असतो त्यात पाक
छंद बरेच तुला तरी आवडीचा तुझा स्वयंपाक
शोभून दिसतो कलर तुला साडी चिकन करी
आमच्या घरची आहेस तू एक लाडाची परी
भविष्याची काळजी तुझ्या,आम्हांस रात्रं दिवस
मम्मी पप्पाचे आशिर्वाद,आज तुझा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छा तुला आज तुझा वाढदिवस
