वाद मैत्रीचा
वाद मैत्रीचा


वाद असो तुझ्या माझ्या मैत्रीचा,
किंवा आपल्या गूढ नात्यांचा
असो कोणताही मुद्दा वादाचा,
पर्याय नाही त्यावर अबोला धरण्याचा
बसूयात का आपण समोरासमोर,
आणि काढूयात का तोडगा त्यावर
मग पाहूयात एकदा डोळ्यात डोळे घालून,
अन काढूयात उपाय त्यावर शोधून
कधी होऊन दोन पाऊल मागे पुढे,
नकोत घ्यायला असे आढेवेढे
असो ती चूक कोणाचीही,
सांभाळून घेण्याची जबाबदारी दोघांचीही
असो कोणताही मुद्दा वादाचा,
पर्याय नाही त्यावर अबोला धरण्याचा