उसंत घ्यावी
उसंत घ्यावी
आयुष्याच्या या वळणावर,
आता जराशी उसंत घ्यावी.
बंधनाचा उंबरठा ओलांडून,
एका नव्या जगाची,
ओळख करून घ्यावी...
आयुष्याच्या या वळणावर,
आता जराशी उसंत घ्यावी.
अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना,
उमेदीची साद द्यावी...
आयुष्याच्या या वळणावर,
आता जराशी उसंत घ्यावी.
नव्या दिशांना आव्हान देऊनी,
जगासमोर स्वतःची एक,
नवी ओळख द्यावी...
