उरले का व्यर्थ मी...
उरले का व्यर्थ मी...
आज पाहिली पुन्हा ती वाट एकली रडत होती
सुन्या आकाशी रंगली शामला ती विचारत होती
सांज सोबती मनीच्या मग अर्थ का वेगळा होता
जगले जे आजवरी तो हृदयांतील श्वास व्यर्थ होता
रंग गहिरी लागली ती आस मनीची कोरडी होती
प्राणात मिसळूनी वहिली ती आसवांची दरी होती
आज भेटली मला ती सांज मनास पुसत होती
बेभान जगली प्रिती ती अर्थहीन कशी होती
आठवणीच्या मेघासवे येतात अश्रुंची व्यथा होती
का कुणास ठावुक व्याकूळ मनाची अवस्था होती
हिशोबात मांडली यादी अर्थपूर्ण अभिव्यक्ती होती
कळली ना रिती जागण्याची व्यर्थ ती आस होती
उरले व्यर्थ का मी फिर्याद मनीची छळत होती
सार्थ जीवन जाहले सांज मनीची बोलत होती
आज फिरुनी येती वादळे घरटे ही उद्ध्वस्त होती
सोबतीला उरले अर्थ फक्त ती आसक्ती व्यर्थ होती
भेटली ना कधी ती छबी मनाची समजवत होती
वेगळी ना तिजहून मी तरी ती का आगळी होती
मनाची ती मनापासून आभार मनाचे मानत होती
जगणे व्यर्थ होते भले अर्थहीन नसे सांगत होती
जगले ते श्वासही ते प्राण होऊन कोणा जगवत होते
उरले ना अर्थ सोबतीस रित्या मनी सल छळत होती

