उरले का काही.
उरले का काही.
गत माझी अशी उदार जाहली
जित तुझी जशी कहर ल्याली
वेळ माझी अशी चुकुनी थांबली
कळ तुझी कशी जिव्हारी लागली
थेंब पावसाळी मनी भरुनी राहीला
झिंग जगण्याची जशी मरूनी गेली
रित जगाची अशी उमजुनी जगली
प्रित जिवापाड रित बदलुनी गेली
रात्र काळोखी मनी भरुनी राहीली
मात्र मरणासाठी आस जळू लागली
क्षण पावसाळी भाव विरुनी जाई
भान जिवाशी आस उश्याला ठेवुनी गेली

