STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

उपकार...

उपकार...

1 min
242

साऱ्या दुनियेचं करुनी भलं

माझं मात्र झालं सारंच वाटोळं,

नातीगोती जपली जीवाच्या पल्याड

मोठ्या मनानं दान सारंच केलं...


स्वार्थ नाही पाहिला कधीच कुठं

झालो भिकारी करून मन मोठं,

झालो कंगाल, पाहवेनात हाल

गणगोत सारंच, दूर आज झालं...


खूप केली लोकांवर, दया अन् माया

तेणं आज सारे लागले दूर जाया,

होते सारे माझे, कोणीच आज नाही

कळलं आज कोणी कुणाचं नाही...


ठेवावा कसा कुणावर भरोसा

इमान जप स्वार्थी माणसा,

आले दूःख दाटून, ढाळीतो अश्रू

तुमचे हे उपकार, कसे मी विसरु...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy