उंच माझा झोका
उंच माझा झोका
युवती मनोहर झुलवी झोका
उंच उंच झोका जाई आकाशी
वरती खालती डुले तो तालावरी
आनंदाने गाणे गुणगुणे ती मनाशी.
काळे भोर, लांब लचक केस कुरळे
घेई ते ही झोके संग युवती बरोबरीने
वाऱ्यावरती भुरभुर ते उडे सारे कुंतल
झोकाही आनंदुनी जाई त्यांच्या संगतीने.
उंच झोका लटके वृक्षाच्या फांदीवर
भरभक्कम दोरीने बांधला तो फांदीला
उंच उंच झोके घेते ती सौंदर्य कामिनी
धुळ झोक्या खालची ही उंच उडे नभीला.
निसर्गाच्या सन्निध्यात,शुध्द पर्यावरणात
झुला तो झुलतच आहे वरती खालती
गार गार शीतल हवा झोंबे तिच्या तनुला
अंग शहारुनी घेई ती गोड लाजरी मधू मालती.
साजणाची असेल ती वाट पाहत वाकुनी
येईल तिचा प्रियकर झोके द्याया मागुनी
झोका घेईल भरारी उंच गगन दिशेला
पुन्हा येईल तो त्याच जोशाने उलटुनी.

