STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

उंच भरारी आकाशी

उंच भरारी आकाशी

1 min
231

आहे तुझ्यात कर्तृत्व 

घेण्या नभात भरारी

दाव सामर्थ्य जीवनी

राहो मनात उभारी


प्रगतीच्या पथावर । 

सदा ठेव तू पाऊल

पहा ती झळकतील

 देण्या यशाची चाहुल


सर्व क्षेत्रात दिपावी

तुझ्या उन्नतीची किर्ती 

मिळो तव प्रयत्नांना

 पूर्णपणे स्वप्नपूर्ती


नवी स्वप्ने नवी दिशा

 कर विश्व पादाक्रांत

जगज्जेता तू होशील

हरण्याची नको भ्रांत


आहे मोकळे आकाश

 करुनिया ती हिंमत

घेता नभात भरारी

जगा कळेल किंमत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational