STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Tragedy Action Inspirational

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Tragedy Action Inspirational

उंबरठा

उंबरठा

1 min
144

"उंबरठा !"

ओलांडते माहेरचा ;

कन्या सासरी जाण्यासाठी,

पतीसह स्वप्नातला संसार थाटण्यासाठी !!


"उंबरठा !"

ओलांडते गृहिणी;

नोकरी व्यवसाय करण्यासाठी ,

दोघांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी !!


"उंबरठा !"

ओलांडते परित्यक्ता ;

जोडीदाराला धडा शिकवण्यासाठी ,

स्वतःसह मुलांना मानाने जगवण्यासाठी !!


"उंबरठा !"

ओलांडते घटस्फोटिता ;

स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी ,

सोबत मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी !!


"उंबरठा !"

एकच असतो ;

स्त्रियांना ओलांडावा लागतो ,

प्रत्येक वेळी वेगळ्या कारणासाठी !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy