STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Romance

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Romance

तू....

तू....

1 min
209

तू मोहरत गेलीस

मी फुलत गेलो

उसास्यांना तुझ्या

मी झेलत गेलो

तू स्वप्न दाखवलेस

मी खुलवत गेलो

तू क्षण घडवलेस

मी साठवत गेलो

तू रंगवत गेलीस

मी रंगत गेलो

तू विणत गेलीस

मी गुंतत गेलो

तू हरवत गेलीस

मी शोधत गेलो

तू निघून गेलीस

मी.....विझत गेलो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance