तू...
तू...
शब्दात तुला गुंफताना
खूप काही बघावं लागतं
तुझ्या नावाला लपवून
तुलाच उल्लेखावं लागतं
शब्दात मांडतो तुला
अर्थ मात्र दडवावं लागतं
भ्रमित करण्यासाठीच
थोडं खोटं बोलावं लागतं
फक्त मला दिसशील
असं तुला रंगवावं लागतं
तुझी अब्रू झाकूनच
मला तुला लिहावं लागतं

