तू उठ नव्याने पुन्हा लढ!
तू उठ नव्याने पुन्हा लढ!
निडर, निःस्वार्थ, निश्चिंत सामर्थ्य तू
नेक, सूर, धीरोदात्त वादळ तू
तू उठ नव्याने पुन्हा लढ!
तिमिरातील केसरी तडीत तू
बाहुत चाप अन् हृदयात शिवाजी
तू उठ नव्याने पुन्हा लढ!!
राग, द्वेष, त्वेष, ना स्मरणात पण
दुष्ट, नीच, दुर्जनांचा ऱ्हास तू
तू उठ नव्याने पुन्हा लढ!!!
मृत समुद्रातही पोहणारा मत्स्य तू
मातृभूमीच्या पराक्रमाची शिकस्त तू
तू उठ नव्याने पुन्हा लढ!!!!
कानन, निर्जन, शैलातला निखारा अन्
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचा रक्षक तू
तू उठ नव्याने पुन्हा लढ!!!!!
माय मातीच्या पोटावर पाय देऊ पाहणाऱ्या
गनिमी मर्कटांचा काळ आहेस तू
तू उठ नव्याने पुन्हा लढ!!!!!!
भारतमातेच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या माझ्या
पस्तीस लाख जवानांना समर्पित...