STORYMIRROR

आ.बा. जाधव

Inspirational Others

3  

आ.बा. जाधव

Inspirational Others

व्याकुळळेली आई

व्याकुळळेली आई

1 min
11.4K

अशी व्याकुळ होऊ नको ना गं आई!

पापण्यांच्या पुरात न्हाऊन काढीन तुझी ही पुण्याई,

थोडी उसंत दे मला, दे जरा अवधी बघ 

आरक्त नेत्रांतून तुझ्या आनंदाचे पाट वाहीन


एवढ्यात खचून जाऊ नको ना गं आई!

तू तुडवते उन्हात बांध लोकाचे माझ्या पोटासाठी

धडपड तुझी ही माझ्या अंतःकरणावर घाव घाली

गहिवरून तुझे उपकार मानतो या थरथरत्या ओठी


अर्धे आयुष्य सोसले थोडं सोस ना आता आई!

भूतकाळ पुसून समाधान घालीन तुझ्या मी ओटी

दुःखाला झुगारलंय केव्हाच मी उरली ती फक्त चिकाटी

तू गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे फुलवीन मी मोती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational