Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

आ.बा. जाधव

Others

4.0  

आ.बा. जाधव

Others

चुकू लागलो

चुकू लागलो

1 min
42


ज्या वाटेवर अंत माझा ती वाट मी चालू लागलो

नको असणारे खेळ भावनांचे पुन्हा खेळू लागलो|


चांदण्या आकाशातल्या असंख्य त्या मोजू लागलो 

उतरणार जी ना सत्यात स्वप्ने ती मी पाहू लागलो ||


सोबती मी माझा पण स्वत:वर टीका करू लागलो

अजाण ते तरी गोडवे त्यांचे रोज नव्याने गाऊ लागलो||


आंधळा प्रवास माझा मी असा चुकू लागलो

पुन्हा पुन्हा चुकण्याचे मर्म अंतरी विचारू लागलो ||


Rate this content
Log in