STORYMIRROR

Pradnya Ghodke

Romance

3  

Pradnya Ghodke

Romance

तू स्वप्न गुलाबी माझे

तू स्वप्न गुलाबी माझे

1 min
13

तू स्वप्न गुलाबी माझे,

गुंतुनी श्वास हो माझे...।।धृ।।


किनार कंकण मंजुळ किणकते,

गे..प्रित मागती मला..

झरझरत्या पापण्यांतुनी,

तोरण करिते खास खुणा...


करूण नभांच्या अथांग व्यथा,

...ढाळुनी आसवे बोलू..या.

रत्न-अश्रूंच्या प्रबळ-प्रभांतुनी,

...रान प्रितीचे फुलवू या...!


तुझे निश्चयी गाण रंगते,

शपथ रक्त-बंधनांची...

संग कराया आज गंधर्वी,

घे माळ लेवुनी कुसुमांची...!!


तू स्वप्न गुलाबी माझे,

गुंतुनी श्वास हो माझे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance