तू माझ्यासाठी खास आहेस
तू माझ्यासाठी खास आहेस
प्रेमाची कविता करताना
तिला मला शब्दात बांधायची आहे
त्याला कारणही तसंच आहे
कारण तू माझ्यासाठी खास आहेस
खरच तुझ्याशिवाय मन माझा रमत नाही
कारण तुझ्याशिवाय मला करमत नाही
काय चाललय माझ्या मनात
मला काहीच समजत नाही
आलीस तू माझ्या आयुष्यात
आयुष्य माझे बदलून गेले आहे
म्हणुनी तू मला सोबत हवी आहे
तुझ्याशिवाय मन माझे काही दुसरे मागत नाही
तू नसताना एकटेपणा खूप जाणवतो
रडते मन माझे सतत
तेच माझा मला उमगत नाही
इतका गुंतलो तुझ्यात की
मीच मला विसरलो आहे

