तू लढ
तू लढ
अग तु लढ प्रयत्न कर
तुझ्या जवळच्या अनमोल
वेळेला अनमोल रत्न कर..
जिंकण हरणे हे वेळ ठरवेल
आपण आपल काम करायच
जगासाठी जिद्देच एक उत्तर
उदाहरण बनायच....
तयार रहा पुढच्या संकटासाठी
तयार रहा एक पायरी चढण्यासाठी
असे जगू नको कि लोक म्हणेल
जन्म घेतला तो पण फक्त मरण्यासाठी...
