तू खळखळता सागर....
तू खळखळता सागर....


तू खळखळता सागर, मी निःशब्द किनारा
तू झुळझुळती हवा, मी वेडा वारा.
तू पुनवेचा चंद्र, मी लुकलूकता तारा
तू रिमझीमती बरसात, मी बेधुंद पाऊसधारा.
तू दरवळ फुलांचा, मी काटा आहे बोचरा
तू स्मितहास्य, मी अलवार हसरा.
तू उज्वल प्रकाश, मी अंधार सारा
तू धगधगती ज्योत, मी पतंग बावरा.
तूच आस नजरेची या, तूच होतेस विसावा
तूच आहेस ध्येय आणि तूच माझ्या कवितेचा पसारा...