STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

तू होशील का माझी राणी

तू होशील का माझी राणी

1 min
15.6K


तिच्या एक नजरेनं

माझ्या काळजाचा झालं पाणी पाणी

मी प्रेम दिवाना तुझा ग साजणे

तू होशील का माझी राणी ?

तुजी चाल जणू हरणी

तुझी ही अदा जीवघेणी

सांग तुझ्या ह्या कोमल हृदयावर

लागेल का माझ्या प्रेमाची वर्णी

मी प्रेम दिवाना तुझा ग साजणे

तू होशील का माझी राणी?

मज देता कटाक्ष प्रेमाचा

तुझी लवते हलकेच पापणी

गातो मी दिनरात

तुझ्या सौंदर्याची गाणी

मी प्रेम दिवाना तुझा ग साजणे

तू होशील का माझी राणी?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance