STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

4  

Author Sangieta Devkar

Romance

तू आहेस म्हणून

तू आहेस म्हणून

1 min
310

तू आहेस म्हणून हा साज श्रृंगार,

हे अस नटने आणि तू माझ्या कड़े पाहण.


 तुझ्या गहिऱ्या डोळ्यात गुंतुन पडण.

 कधीच जमले नाही काही पण,

 सहज पणे तुझ्यात स्वतःला हरवत गेलेली मी.


 सगळ काही चुकतय अस वाटत असताना,

 तुझ्या नजरेत यशस्वी होत असलेली मी.


  तू नसतास तर काय झाल असत माझ?

  साऱ्या जगाला बाजूला करून तुझ खर मानाव अस का वाटते मला?


 तुझ खर की खोट हा उहापोह कधीच करावासा वाटला नाही.

  तुझ्या सश्रद्ध मनाला ओलांडून कधी जावेसे वाटलेच नाही.


 ही एक आंतरिक सुख संवेदना होती का?

 का माझ मन जपण्याचा तुझा अट्टाहास?

 आणि हे खर असेल तर तुझ्या वरुन जीव ओवळून टाकला तरी कमीच आहे.


  तुझ्यातच आता मी सामावलेली, माझ्यात कितीशी मी उरली आहे?

  हा प्रश्न अजुन ही बाकीच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance