तुरपाई
तुरपाई
निरागस हास्य ते चेहऱ्यावर,
बाबा असतानाच दिसले.
मी अनपड म्हणत लेकास,
सारे आधिच देऊन फसलेली.
संसार रहाटाला चौदाव्यात जुपल,
नणंदा, दिर, चार पोर, इतरा ही पोसल.
लक्तरांस तुरपाई मारत हसल,
संपात ही सुखात मानेन जगवल.
नात्यातील विश्वासघाती तुरपाई,
कच्चा दोऱ्यागत सहज विखुरली.
निरागस प्रेम,निष्ठा जपलेली,
नातीच नात विसरून बसलेली.
लेकराचा पगार लेकरास पुरे नाही,
एकाच मुलाचे शिक्षण ते झेप नाही.
साऱ्यांसाठी राबतानात धन्य होते माय,
सोन्याचा दिवस, पण हव्यास पाही.
आतातरी सुखाचे घास खा तू बसून,
म्हणे त्राण शरीरात मी कष्टाच खाईन.
तिच्या हातच्या शिरा उलट्या सगळ्या,
सत्वपरीक्षेचा खेळ होतोच आगळा.
