तुम्ही
तुम्ही
प्रश्न कुठलाही असो,
उत्तर तुम्ही आहात.
रस्ता कसाही असो,
त्याचा शेेेवट तुम्ही आहात.
दुःख कितीही असो,
सुख तुम्ही आहात.
अपेक्षा कितीही असो,
आस तुम्ही आहात.
राग किती ही असो,
प्रेम तुम्ही आहात.
स्वप्न कस ही असो,
त्यातही तुम्ही आहात.
जग कसंही असो,
माझ्या आयुष्यात
तर तुुम्हीच आहात.

